पान:रमानाटक.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
रमानाटक.

र० -- ( त्याच्या गळां मिठी मारून) असं सदोदित जवळ असावं.
कृ० -- मग तसें होणार नाही का? आणि आतां काय कमी आहे. जवळ नाहींस तर काय आहे ?
र० -- असई जवळ चसण्यासाठी कोणाचा धाक नको.
कृ• -- अग आदब ही फार चांगली यानेंच स्नेह निभतो.
र० – तुमच्या मनाला नाहीं निभणार वाटतं ?
क० – निभेल परंतु बोभाटा होईल. आणि लोक नांवें ठेवतील
र० – मी कोणाचीही परवा करीत नाहीं, ( गळां मिठी मारून ) या जिवापेक्षां मला कांहीं अधिक वाटत नाहीं.
कृ० – सर्व खरें परंतु मला माझ्या घरचा धाक आहे.
र०– हो बरी आठवण झाली.
कृ०– कशाची.
र०- दुसरं कांहीं नाहीं. तुमचं घरीं कोण कोण आहे
कृ॰ — आई आहे आणि एक मोठा व एक धाकटा असे दोनभाऊ आहेत. थोरल्या भावाला तीन मुले आहेत.
र० - तुमचं लग्न झालं किंवा नाही ?
कृ० – लग्न झाले होते परंतु देवानें माझी बायको म रून गेली व दोन मुलेही मेली (दुःखीत होतो).
र० – ( गळां मिठी मारून ) देवापुढं कां कोणाचं चालतं, उगीच जिवाला दुःख देण्यांत काय आहे.
कृ० – ( डोळ्यांत पाणी आणून ) बायकांवांचून व्यर्थ जीणें आहे.