पान:रमानाटक.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रवेश ६ वा
कृष्णराव, रमा, सकु, देवजी.

कृ० – ( मनाशी ) ईश्वर कृपेनें रमाचा आपला स्ने- ह झाला, परंतु निभावेलकसा कोण जाणे. कारण वायकांची मने फार चमत्कारिक असतात. को- णत्या वेळी त्यांची बुद्धी फिरेल याचा नियम नाही. आपण तर तिच्या प्रेमाला भुलून तिला वचन दिले आणि तिनेही मला फार श पथा घेऊन क्रिया करून दिली, यावरून मीही नादाला लागलो. असो में होणें असेल तें होईल. एकवार वचन दिले त्यांत अंतर आणायचे नाही. आतां तिच्या आईबद्दल धाक आहे खरा परंतु तिर्ने त्याचा बंदोबस्त मी करीन ह्मणून सांगितलें आहे. तेव्हां तीही काळजी विशेष नाहीं, झाले नवरा तर तिच्या वचनांच आहे. ( इतक्यांत रमा येते ) ये बैस. ( तिला जवळ घेऊन बसतो )
र० --कां कशाचा विचार चालला होता :
क० -- कांहीं नाहीं उगीच बसलो होतो.
र० --माझ्या मनाला किनई ( थांबते)
कृ० -- (गळ्यांत हात घालून) काय तुला वाटतें ?
र० - - ( लाजून खालीं मान घालते )
कृ० -- कां बोलत कां नाहींस सांग काय असेल तें.