पान:रमानाटक.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२८
रमानाटक.

दे० – माझे बोलणें शोभत नाही आणि वाईट वागणे बरें कां ?
स० -- मला पक्कं समजल्यावांचून मी तरी काय बोल?
दे० --बरें तर प्रत्यक्ष दाखवीन.
स० -- मग मी बंदोबस्त करीन. (ती निवून जाते)
दे० ---(मनाशी) दैव फिरले ह्मणजे सर्व गोष्टी वि परीत होतात. असो. या दोघांचीही खोड मोडली पाहिजे. आतां स्वस्थ बसून उपयोग नाही. तर ही जागा सोडून आपण दुसरीकडे रहाण्यास जावें. ( असा रागांत निघून जातो)