पान:रमानाटक.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

२७

स० – काय झालं काय ?,
दे० – व्हायचें काय! दुसऱ्याच्या तोंडाला काळोखी.
स० -- कोणी लाविली ती ?
दे० --तें मला सांगतां येत नाहीं. असें जर होतें तर मजबरोबर लग्न कशाला केलें ?
स० -- माझ्या रमेचा कांहीं अपराध आहे का ?
दे० -- लहान सामान्य नव्हे.
स० -- तिनं काय केलें तें तर सांगाल ?
दे० -- सांगूं काय ?
स० -- ती वाईट काय वागली!
दे० - - वागली नव्हे, वागते.
स० - - हें बोलणं कांहीं आपल्याला शोभत नाहीं.
दे० -- होय. आपल्या मनुष्याचा अपराध दिसत नाहीं.
स० - - दाखवून द्या काय केलं तें.
दे० -- ठीक, आतां इतकेंच बाकी राहिले आहे.
स० -- अहो, तर ती माझ्याजवळ सदोदित असते. मला कसं समजलं नाहीं. आणि तुम्हालाच कसं समजलं!
दे० -- आपल्याला जर खोटें वाटत असेल तर प्रत्यक्ष दाखवीन.
स० – असं कधीं माझ्या पोरीच्या हातून होणार नाही उगीच कांहीं निमित्य ठेवणं चांगलं का?
दे० – वहावा एकूण मीच खोटा तर ?
स० – तसं नव्हे पण कांहीं तरी विचार करा. भलतं- च बोलणं शोभत नाहीं.