पान:रमानाटक.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

र० – बोलूं काय! मला लाज वाटते.
कृ० – ठीक आहे, मी समजलों. परंतु आपला पक्का विचार करा. नाहीं तर अलिकडे असे प्रकार दि सतात की, पुरुषांना नादी लावावें आणि अखेरीस फसवावें.
र० - माझा विचार पक्का आहे. आज दोन चार दि वसांपासून आपल्याला विचारीन ह्मणते पण धीर होईना. कारण, इकडं राग आला तर बाई काय उपयोग! ह्मणून बोलले नाहीं. माझ्यानं बोलल्या- वांचून राहवेना; याकरितां आज धीर केला.
कृ०- -ये अशी. ( तिला जवळ घेऊन. ) मी कांही नाकबूल नाहीं, परंतु पुढे परिणाम चांगला होत नाहीं, ह्मणून मनाला शंका वाटते.
र० - कांहीएक शंका वाटायला नको. मी आपल्या आज्ञेबाहेर काडीइतकी वागणार नाहीं. आणखी पाहिजे तें झालं तरी आपल्याला अंतर देणार नाहीं. आपल्याकरतां प्राणाची सुद्धां आशा ठे- वणार नाहीं.परंतु (गळ्या मिठी मारून) मज- वर प्रेम असून आतां जशी जवळ आनंदांत आहे असाच आनंद अक्षयी असो. यापेक्षां मला तुमचे डागडागिने नको, कांहीं नको.
कृ० – रमा, बायका प्रथम अशाच कबुलायती करतात. परंतु अखेरीस त्यांना स्मरण रहात नाहीं.
र० – बोलून काय दाखवूं! पण आपल्याजवळ राहून वागून दाखवीन.