पान:रमानाटक.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

२१

कृष्ण० -- (खिशांतून घड्याळ काढून पाहतो.) दहा वाजले. ( पुन्हा सतार वाजवू लागतो. )
र० – बोलले तर खरें. पण ते सतारीच्या नादांत आहेत. याकरितां आणखी एकदा विचारावं. ( पु- नः विचारते ) तुम्ही जे वाजवितां याला काय म्हणतात,
कृ० - याला सतार ह्मणतात. ( सतार बंद करून ति च्याकडे पाहून.) तुम्ही अशा येथें दाराशी उ भ्या राहिलांत हैं जर कोणी पाहील तर विनाकारण लोक आम्हाला दोष देतील. याकरितां तुह्मी आप- ल्या घरांत जा. कारण, आझाला आहे वरीं धाक,आणि घर आहे जवळ तेव्हां फार जपून वागावें लागतें.
र०-भलत्याच गोष्टीचा धाक पाळला तर चालेल का?
कृ० – सर्व खरें, परंतु आतांचे दिवस फार वाईट आ हेत. लोकांच्या मनांत सहज संशय येते. त्यां तून माझ्या नांवाचा बोभाटा असल्याकारणानें भीति पाळावी लागते. बाकी मी कोणालाही भिणारा नव्हे. स्वतःचे जिवावर पाहिजे तें कर- णारा आहे.
र० - मीही आपल्याप्रमाणंच कोणालाही भिणारी नाही.
कृ० – मग चिंता नाहीं. (पुनः सतार वाजवूं लागतो.)
र० - मग सतार वाजवायाला वेळ नाहीं व.टतं ?
कृ० – ठीक आहे. (सतार खाली ठेवून. ) कां काय म्हणणे आहे ?