पान:रमानाटक.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

२३

कृ० – -ठीक आहे. या तुझ्या प्रेमाकरितां ह्मणून मी या नादांत पुनः पडतों. तर अखेर चांगली कर ह्मणजे झालें. मीही तुला अंतर देणार नाही. परंतु माझा स्वभाव आहे तामसी मला कोणाचे बोलणे सहन होत नाहीं. आणि परक्याशी बोलणें तर "मुळींच आवडत नाहीं. नीट रीतीनें वागशील तर तुझ्या तूं नवऱ्याजवळ राहूनसुद्धां तुझमाझा स्नेह चांगला निभेल. कारण, दहा बायकांत तुझें सौ- भाग्य राहून जातींत राहण्याला हरकत नाहीं.
र० - जसं आपण सांगाल तशी मी वागेन मग तर झालं ना ?
कृ० – बरं पण तुझ्या आईचें मत कसे काय ? नाही तर ती करील पंचाईत, ह्मणजे दोघांचीही फजिती.
र० – त्याविषयीं तुह्माला विलकूल काळजी नको. मी सर्व बंदोबस्त करीन.
कृ॰ – याविषयीं अगदीं वचन. ( हात पुढे करतो. )
र० - हो हो. ( त्याच्या हातावर हात मारते. )
कृ० – ठीक आहे तर. ( घड्याळ पाहून ) आतां दोन वाजायला आले; तर नोकरीवर गेलें पाहिजे असें बोलत बसून उपयोग नाहीं. कोणी पाहीलें तर पंचाईत. आणखी परक्याची ताबेदारीही फार वाईट.
र० - मी तरी तेंत्र ह्मणतें की ही लोकांची भीति जा ऊन आपण असे आनंदांत केव्हां सुख भोगूं.
कृ० – ईश्वर करील तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील.