पान:रमानाटक.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
रमानाटक.

असाच आनंदांत वेळ घालवो ह्मणजे पुरे. ( पुनः सतार वाजवूं लागतो. )
रमा-या पुरुषांच्या ठिकाणी काय मोहनी असेल ती असो पाहिल्यावांचून चैन पडत नाहीं. झोपेत जरी असल्यें आणि पायांतील बुटाचा आवाज ऐकला की जागी होतें, इतकं माझं मन यांच्याजवळ लाग लं आहे. मीच फाय परंतु जितके त्यांचे स्नेही ये- तात त्यांना सुद्धां यांच्यावांचून गोड लागत नाहीं, जो तो यांच्याइथं येऊन बोलत बसत असतो. आ णखी पहातें तो सगळ्यांवर यांचं वर्चस्व आहे. कोणी यांच्यापुढे बोलत नाहीं. अहाहा यांचं प्रेम जर मजवर बसेल तर मी फार सुखाची होईन सदोदित जवळ बसून राहीन आणि मन शांत क रीन. देवा येवढं माझं गान्हाणं ऐक. ( विचार करून ) या वेळेस हे एकटेच बसले आहेत पण बोलावं कसं. ( थांबून इकडे तिकडे पाहून ) जें होईल तें होवो माझ्या नशीबानं शेजारीपाजारीसु- द्धां वरांत कोणी नाहीं. आणखी आईही घरांत निजली आहे, तर आपण हिय्या करून बोलावंच. ते चतुर आहेत तेव्हांच समजतील.( दाराआ डूनच कृष्णाजीपंतास विचारते ) आतां किती वा जले असतील ?
कृष्णा० – ( दाराकडे पाहून ) कोण विचारतें तें ? आतां किती वाजले ?
रम। - मी आहे रमा.