पान:रमानाटक.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

१९

देव० --कोळशाचा.
कृष्णा० --हो तर ती नौकरी अगदींच वाईट असते, कारण सदां अंग काळे होतें.
देव० – याकरितांच मी सोडली.
कृष्णा० – बरं तुमच्याकरितां मी प्रयत्न करून पाहीन.
देव० – मजवर फार उपकार होतील.
कृष्णा०-यांत उपकार कसले, मनुष्यांनी एकमेकां च्या उपयोगी पडावें हा धर्मच आहे.
देव० – जार्तो तर मी आतां.
कृष्णा॰ — ठीक आहे. ( देवजी निघून जातो.) मनु- प्याला उद्योग नसला म्हणजे फार कठिण स्थिति आहे. त्यांतून ज्याच्या मार्गे प्रपंच आहे त्याला तर अगदीं कांहीं सुचत नाही. मलाच पूर्वी नोकरी नव्हती तेव्हां कसा वेड्यासारखा झालो. आतांशीं नोकरी करूं लागल्यापासून मात्र मनाला सुख वाटूं लागलें ( इतक्यांत रमा येऊन दाराचे आड बाजूस गालांत हंसत उभी राहते ). परंतु या कामाकाना- च्या त्रासामुळे जीव अगदी दमून जातो, घटकाभर सुद्धां विश्रांति नाही. त्यांत मालक चांगला आहे ह्मणून केव्हां तरी घरी रहाण्यास सवड सांपडते. खरी विश्रांती. म्हणजे रात्री मिळते, तर मित्रमंडळी येऊन ऐषआरामांत कांहीं वेळ जातो. तेणेंकरून बरे वाटते. आतां तर्से जर न करावें तर आजपर्यंत आपला वेळ सदां आनंदांत गेलेला तेव्हां मित्रा वांचूनही चैन पडत नाही. असो, ईश्वर करो आणि