पान:रमानाटक.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
रमानाटक.

देव ० - मला एखादी नोकरी लावून द्याल तर बरें हो ईल कारण ही शहरची वस्ती आणखी माझ्या मा गें दोन तीन माणसांचा खर्च त्यामुळे मी अगदीं कंटाळून गेलो आहे. . आपण जर एवढी मेहेरचा- नी कराल तर फार उपकार होतील. आणि तु मर्चे नांव होईल.
कृष्णा ०. -कसली चाकरी कराल तुझी.
देव० – नी आपण सांगाल ती, मात्र मजुरीचें काम नको कारण मेहनत माझ्याने होणार नाहीं.
कृष्णा – अशी नोकरी मिळण्याला फार प्रयास केले पाहिजेत.
देव० – आपल्या सारख्यांनी असे ह्मटल्यावर मग काय उपयोग ?
कृष्णा ० – अहो हल्लीं येथें लिहिणाराला सुद्धां नोक- री मिळण्याची पंचाईत आहे मग तुह्मी तर बिन लिहिणारे आहांत. तशांत कोठें कोणाच्या का- रखान्यांत एखादी मोकदमाची जागा झाली तर पाहूं तजवीज. एक दोघांना मी सांगेन खटपट करायला.
देव० – इतकी मेहरबानी झालीच पाहिजे कारण मी फार प्रसंगांत आहे.
कृष्णा० – पूर्वी तुम्ही काय काम करीत होता?
देव० - मी एका व्यापाऱ्याजवळ होतो तो धंदा मला बरा वाटेना म्हणून ती नोकरी मी सोडून दिली.
कृष्णा० – असा कोणता त्याचा धंदा होता ?