पान:रमानाटक.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रवेश ४ था.
कृष्णराव, देवजी, नंतर रमा.

कृष्ण० --- [मनाश] काल हातांत सतार असतां ती रमा नेत्रसंकेत करून हंसत गेली यांतील भावार्थ काय असावा बरें! काय तिच्या मनाला वाटले अ सेल तें असो. एकंदरींत पात्र उत्तम आहे, परंतु अशा बायका बळेच पुरुषाला नादी लावून फसवि- तात. तसा तर प्रकार नसेलना? नाहीं तर आता- शीं कोठें आपण नीट वागूं लागलो आहोंत तोच हा प्रकार जर घडला; आणि ही गोष्ट जर बळवंतरा- वाला समजली तर तो फार दूषण देईल. इतकेंच परंतु तो मजबरोबर बोलणार सुद्धां नाहीं तेव्हां अ शा गोष्टीकडे अतःपर लक्ष द्यावयाचें नाहीं नुकतेच कोठें लोक मला चांगला वागतो म्हणून म्हणू ला- गले आहेत. याकरितां अशा गोष्टीकडे लक्ष देणें बरोबर नाहीं व याचा सारासार विचार केल्यावांचून आपण नादी लागून उपयोग नाहीं. (इतक्यांत र मेचा नवरा देवजी येतो.)
देवजी० - रामराम कृष्णराव.
कृष्णा- रामराम. या बसा.
देव० – मी तुमच्याकडे कांहीं कामासाठी आलो आहे.
कृष्णा० – भाझ्याश असें काय काम आहे सांगा.