पान:रमानाटक.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

कृष्ण० – ( खिशांतून घड्याळ काढून पाहतो ) आतां तीन वाजले.
बळ० – आतां पुरे करा.
कृष्ण ॰ - (पंचवीस रुपये विड्यांत घालून) घ्या चंद्राजी
चंद्रा० – ( विडा घेऊन लवून मुजरा करून ) आतां होईल हुकूम •
कृष्ण० – हो हो. जा आतां रात्र बरीच झाली.
चंद्रा० – गरीबावर नजर असावी.
कृष्ण० - हे काय सांगायला पाहिजे (ती निघून जाते).
बळ० – चला आतां आपणही निजूं.
कृष्ण० – आतां सर्वजण इथेच निजा म्हणजे झाले.
बळ० –मको घरीं गेलें पाहिजे.

(सर्व निघून जातात ).