पान:रमानाटक.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

१५

कृष्ण० - शाबास चंद्राजी! आतां एखादें प्राकृत होऊं द्या.
चंद्रा० – ठीक आहे.

लावणी.
चाल तुजवरून काया ओवाळुकी.

तुजसाठीं किति मी झुरू झाले पांजरू, घिर
हा धरूं, प्रियकर राया ॥ नाहीं सौख्य,
सदोदित दुःख मुख्य, हे कैशी विधिची
माया || घरि असुनि पंचपकान्न सेवितां
भिन्न कदान हो वाया ॥ प्रितछंद, तुटेना
वंद, वंदिते अक्षय तुमच्या पाया ॥ परनार
विपाचे घर,सांगू कुठवर नाहीं तिळभर मज-
वर, माया ॥ झाले ढंग नका करूं भंग रंग
हा दो दिवसाचा वाया ॥ धनलोभी असति
कसविणी, करिति जाचणी, जणु वाघिणी
पहाती खाया ॥ कुठे अनुसुया, शिवजाया,
जगिया, नाहींत ऐशा स्त्रिया | जिव ओ-
वाळीन तुजवरून, वसले मी हरून, दया
मनि धरून यावे हो ठाया ॥ धरी चरण,
नको देऊं मरण, अर्पण केली माझी काया ||
स्नेह असो भ्रमरापरी, कमलनीवरी नको
परद्वारी जाऊं वसाया ॥
कृष्ण० –वाः फार मजा केली..
गोपा०.– घ्या चंद्राजी पान ( तबक पुढे करतो ).