पान:रमानाटक.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

१३

तर रहा, नाहीं तर मी पाहिजे तिकडे जाईन. मा- झ्या जन्माचं मातेरं केलंस आणि आतां मी कृष्णरावाबरोबर राहण्याचं मनांत आणलं तर तूं नको कां म्हणतेस? मला जसं गोड लागेल तसे मी करीन. बहुतकरून तिनं कृष्णरावाला पा- हिल्यावर त्यांच्या गुणावरून आई मला हो म्हणे- ल. ( विचार करून ) जे होईल तें होवो. आपणच त्यांच्याशी बोलण्याचा घाट घालावा.उद्यां ते घरी आल्यावर एकांत संधि पाहून समक्ष विचारा- वं ह्मणजे झालं. तेही चतुर आहेत. तेव्हांच समज- तील. ( नायकीण आलीसें पाहून ) आतां फार वेळ उभं राहून उपयोग नाहीं. ते इकडेच पहातात तर जाताना त्यांना संकेत करून जावा. ( असें बोलून नेत्रसंकेत करून निघून जाते. )
बळ० – ( नायकिणीस पाहून ) या चंद्राजी. बसा. ( तिला बसण्यास जागा दाखवितो.)
गोपाळ० – कां फार उशीरसा लागला चंद्राजी?
चंद्राजी— जी, वस्तादजी यायचे होते ह्मणून.
बळ०- आतां उशीर कां ?
चंद्रा० – आमची तयारीच आहे. (असें बोलून तब- ला सारंगी वगैरे मिळवून गाण्यास आरंभ होतो.)

टुंबरी.
राग ताल त्रिवट.
मृगनैनी नारमुख चंद्रवदन ॥ सुर्याची कांती