पान:रमानाटक.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
रमानाटक

.

वळ०.कां कृष्णराव तुझ्या मनाप्रमाणें झालें ना ?
कृष्ण० – तुझ्या सारखा मित्र दुनयेंत मिळणार नाहीं.
गोपा० – बरें, आतां उगीच बसून काय उपयोग ! नायकीण येईपर्यंत आपण गंजीफा खेळूं.
वळ० — ठीक आहे, ह्मणजे वेळ तरी जाईल.
गोपा ० – कृष्णराव, पेटी कुठे आहे?
कृष्ण० – देतों ( जवळच्या पेटींतून पेटी काढून आणून देतो. )अरे पण अद्याप मंडळी कोणी आली नाहींत ?
वळ • – येतील आतां. ( अर्से बोलून गंजीफा खेळूं लागतात. )
र० – ( बाजूस उभी राहून ) कसं बरं करावं? आतां यांचें स्नेही येऊन बसले तेव्हां ही वेळ कांही चांगली नाहीं. ( विचार करून ) मी होऊन जर गोष्ट काढली तर न जाणो राग येईल. की काय कोण जाणे बरं दुसऱ्या कोणा जवळून सांगावं तर इतकं आपल्या खात्रीचं आहे कोण? त्यांतून मला इथं येऊन आठ दहा दिवस झाले.तेव्हां शेजा- रीपाजारी लोक तरी बरं म्हणतील कां?आईला ही गोष्ट कळली तर तिला राग येईल.याकरि- तां तसंही करून उपयोग नाहीं. एकदां त्याच्या- शीं बोलणं होऊन त्यांनी मला संभाळण्याबद्दल कबूल केल्यावर आईला समजून जरी राग आला तर फारशी भीति नाहीं आणि तिला साफ सांग- तां येईल की, जर तुला मजजवळ राहणं असलं