पान:रमानाटक.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

२१

खिडकींत उभी राहून पहातें. आतां येतील काय? कोणी तशा पोषाखाचा मनुष्य पाहिला ह्मणजे भास होतो. अहाहा! काय एक एक गुण त्यांच्या अंगीं आहेत! रात्री जेव्हां कांही गात असतात तेव्हां मी घरांत जरी आईच्या धाकानं निजतें तरी झोप येत नाहीं, सर्व लक्ष तिकडं असतं. त्यांचे स्ने- ही तरी सर्व कसे त्यांच्या हुकुमांत आहेत! सर्वांत मानमान्यता चांगली आहे; गुणानं, रुपानं कसें योग्य आहेत! देवा, असा जर मला नवरा दिला असतास तर किती चांगलं झालं असतं! परंतु माझं करंटं नशीब ह्मणून या कृपात्राच्या पदरी पडले. असो, जे होईल ते होवो कृष्णरावार्शी प्रेम जो- डून त्यांच्यासह सुख भोगावं, यापेक्षां कांहीं न- को. त्यांनी जरी मला डागडागिणे दिले नाहींत तरी मी आशा करणार नाहीं, जशी ओली कोरडी भा- करी घालतील तशी खाऊन पायाची सेवा करून राहीन. (इतक्यांत बळवंतराव वगैरे मंडळी येतात.)
बळ● – कां कृष्णराव? काय चाडलें आहे?
कृष्ण० – कांहीं नाहीं, तुमचीच वाट पहात बसलों होतो.
गोपा० –बरें बळवंतराव, तुह्मी चंद्राजीला केव्हांची वर्दी दिली!
बळ० दाहा वाजतांची.
कृष्ण० - (खिशांतून घड्याळ काढून पाहतो.) आ- तारों सव्वा नऊ झाले. येईल आतां.