पान:रमानाटक.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमांनाटक.
१०
प्रवेश ३ रा.
स्थल – कृष्णरावाचा दिवाणखाना.
कृष्णराव, रमा, बळवंतराव, गोपाळपंत.
वगैरे मंडळी व साजिंद्यासह नायकीण.

कृष्णाजीपंत – (मनाशीं) अहाहा! उद्योग केल्या- पासून मनुष्याला किती सुख आहे! मी आजपर्यंत नोकरी करित नव्हतो तेव्हां सर्व लोक मला नांवें ठेवीत होते; तीच मी हल्लीं नोकरी करूं लागल्या- पासून जो तो मला चांगला वागू लागला ह्मणून ह्मणतात; त्यामुळे माझ्या भावालाही बरे वा लागले. बळवंतराव तर जेव्हां तेव्हां ह्मणतो की, असा जर वागशील तर मी फार खुषी होईन, आणि तें खरेंच आहे. उद्योग करून एखादा छंद केल्यास कोणी नांवें ठेवीत नाहीत. फार कशाला, आज मी हट्ट घेतला तेव्हां बळवंतरावानें नायकि णीचें गार्णे करण्याचा बेत केला व त्यांत तो फारसा बोलला नाहीं, तेव्हां मनुष्याचे मुख्य कर्तव्यकर्म उद्योग हेच आहे. (असा विचार करीत बुक वाचीत बसतो. )
र० – कायचाई करावं ? यांना पाहिल्या दिवसापासून मला कांहीं चैन पडत नाहीं. घटकाभर दिसले ना- हीत तर मला अन्न गोड लागत नाहीं. सारा वेळ