या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.
जबाब देईन कीं, लग्न झाल्या दिवसापासून तूं
कांही मला खायला किंवा चोळीलुगडं वगैरे कां-
हींच दिलं नाहींस. त्यांतून घरांत कोणत्याही प्रका-
रानं सुख लागत नाहीं; तेव्हां तुझ्या घरी राहून
तरी काय उपयोग ! बरं, इतका प्रकार करायला
आपल्या मनासारखा आधार देणारा तरी कोण
आहे? (विचार करून) हो गडे बरी आठवण झाली.
ते दिवाणखान्यांत राहणारे कृष्णराव फार चांग-
ल्या स्वभावाचे दिसतात. त्यांची माझी जरी फा-
रशी नजरानजर नाहीं तरी ते संभावित दिसतात.
तेव्हां त्यांच्या विषयीं आठ पंधरा दिवस बारीक
रीतीनं तपास करावा ह्मणजे बरं. आलाच योगा-
योग तर फार चांगलं होईल. कारण त्या पुरुषा-
ला मी आज चार दिवसांपासून पाहतें, तर तो महा
थोर दिसतो. असो, आतां देवाचा योगायोग
असल्यास ही गोष्ट फारच चांगली होईल. (असे
बोलून निघून जाते. ).