पान:रमानाटक.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

स० – सागितलं नाहतिर मी तरी काय समजूं बरं.
२० – ( खाली मान घालून उंगीच बसते )
स० – बया असं कायवरं करतेस तुलाजर बरं वाटलं नाहीं तर मला गोड लागेल कां? मी तरी काय करूं. तुझ्याकडे पाहून मी सर्च दुःख विसरून गेले. आतां हे तुझें आनंदाचे दिवस. तुझी दोघं सुखानं संसार करूं लागलात ह्मणजे माझी काळजी दूर झाली, मी आहे तोपर्यंत तुमची नीट व्यवस्था लावून देईन. आपण नवऱ्याच्या मर्जीनं वागावं, तो जरी नीट नाहीं तरी त्याला वागविण्याचं काम आपलं आहे.
र० – हेग काय आई तूं मला सांगतेस. मी तुला त्याबद्दल कांहीं ह्मणते कां? उगीच मला त्रास देखूं नकोस.
स० – बाळ अशी कंटाळूं नकास. मी सर्व समजते पण करूं काय ?
र० – तूं या वेळेस माझ्या बराबर बोलू नको, मला उगीच वसूं दे, दोन घटका स्वस्थ.
स० – बस बरं मी जातें घटकाभर झॉप घेते. ( निवून जाते ).
र० - काय बरं करावं आईला एका एकी जर को- णती गोष्ट सांगितली तर तिला ते वाईट वाटेल. परतुं मी हट्टच जर घेतला तर ती नाहीं हाणणार नाहीं, इतकं मात्र पकं मला दिसतं. आतां कायती भिती नवऱ्याची. तर त्यालाही वेळ आल्यास