पान:रमानाटक.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
रमानाटक.

बापाची कीर्ति केव्हढी त्यामुळं हे करणं मला बरं दिसेना. असा विचार करून आजपर्यंत दिवस घालविले. पोरवयांत जरी मला हे समजूं लागलं, तरी आईच्या धाकामुळं माझ्यानं वांकडं पाऊल टाकवलं नाहीं. परंतु आतां मला पूर्ण कंटाळा आ ला. असं दुःख भोगण्यापेक्षा आपल्या मनाप्रमाणं एखादा जिवलग पाहून त्याजबरोबर आनंद करावा. आईला राग आला तरी चिंता नाहीं. ( इतक्यांत सकुबाई येते. )
सकु – रमा अग रमा. काय करतेस तूं ?
रमा -कांहीं नाहीं. सहज बसले आहे.
स० – तुला जेवायचं नाहीं कां ?
र० - मला नाहीं गडे आतां भूक लागली.
स० - अग मवापासून ह्मणत होतीस, आणखी आतां भूक नसायला झालं काय?
र०माझ्या जिवाला गड़े बरं वाटत नाहीं. तूं जेवून वे मी आपली जेवीन केव्हां तरी.
स० – तूं आज अशी कां दिसतेस. तोंड अगदी उ तरलं आहे. आणखी मोठ्या काळजीत मनुष्य असावं अशी विचारांत अगदर्दी निमनशी दिसतेस.
र० - विचार कशाचा ! माझ्या जिवालाकिनी आज बरं वाटत नाहीं. मघापासून इथं बसले पण करमतच नाहीं कशी हुर हुर वाटते.
स० - असं व्हायाला तुला काय झालं.
र० - तें कांहीं माझ्यानं सांगवत नाहीं.