पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण७ वे





तुझे आहे तुजपाशी



  पु. ल. देशपांडे यांचे 'तुझे आहे तुजपाशी' हे नाटक म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक आश्चर्यकारक नाटक म्हटले पाहिजे. स्वतः पु. लं. ना आपल्या नाटकातील सरस-नीरस ठरविता येणे कठीणच मानले पाहिजे. एखाद्या आईला अपत्यांचा मोह असतो तसा लेखकाला आपल्या पिलावळीचा मोह असतो आणि या पिलांच्यापैकी सामान्यपणे दुर्लक्षित होणाऱ्या अपत्यावर आईची माया जास्त असते. जी कलाकृती लोकप्रिय आहे तिला तर सर्वमान्यता मिळालेलीच असते. म्हणून लेखक दुसऱ्याच कुठल्यातरी कलाकृतीकडे आपली आवडती म्हणून बोट दाखविण्याचा धोका असतो. स्वतः पु. लं. ना त्यांच्या नाटकांच्यापैकी सर्वांत आवडते नाटक कोणते असे विचारले तर त्याचे उत्तर ते काय देतील हे सांगता येत नाही, पण प्रेक्षकांनी आणि रसिकांनी आपला कौल 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाच्या बाजूने दिलेला आहे. लोकप्रियतेचा हा कौल पु. लं. च्या बाजूने पडला तसा प्रतिष्ठा व मान्यतेचाही त्यांच्या बाजूनेच कौल पडलेला आहे. आधुनिक मराठी नाटकांपैकी अत्यंत लोकप्रिय असे हे नाटक मानलं पाहिजे.
 इ.स. १९४० च्या नंतर व्यावसायिक रंगभूमी अशी महाराष्ट्रात फारशी शिल्लकच राहिलेली नव्हती. तुरळक जी मंडळी व्यावसायिक रंगभूमीवर होती, त्यांनाही या व्यवसायाचा जवळपास शेवट होत आहे हे जाणवलेले होते. तरीसद्धा नाटकांचे वेड गाढ होते त्यामुळे नाटक जगविण्याचा प्रयत्न चालू होता. इ.स. १९५० नंतर या हौशी रंगभूमीला नव्याने उत्साहाचे उधाण आले. बोलताना आपण नवीन कालखंड इ.स. १९४५ पासून टाकतो. दुसरे महायुद्ध

९८/ रंगविमर्श