पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जिवंत मोकळेपणा आहे.
  एक विनोदी लेखक म्हणून पु. लं.च्या कडे पाहताना जे जाणवते ते हे की त्यांच्या या विनोदाच्या रूपाने मराठी विनोद बौद्धिक व स्थळ-काळ विशिष्ट पातळी ओलांडून किती तरी पुढे व खोल जात आहे, पण अशी काही ठिकाणे सोडली म्हणजे वाटते हे आपले वैशिष्ट्य आहे अशी सुजाण जाणीव पु. लं.ना नेमकी झालेली आहे काय? की ते हसवण्याचा माझा धंदा इतकीच आपली पातळी समजतात? त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या प्रतिभेची जात ज्या नव्या वाटेकडे त्यांना खेचते आहे ती नवी वाट मळविण्यासाठी आज पु. लं. नी निर्माण केलेले स्वतःच्या चौरसपणाचे आवर्त थोडे ओलांडले पाहिजे.

रं....७
पु.ल.देशपांडे / ९७