पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुशीलेची जीवननौका समाधानाच्या वातावरणात डौलत पैलतीरी पोचली असती. विद्याधर तिला भेटतो व ती सुखी होते. शरीराची खेच जिला ओढते आहे त्या द्रुमनचा सारा भार दैवाच्या शिरावर आहे. हाताशी असणाऱ्या पुरुषावर ती भाळते. शरीराच्या आगीत होरपळण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ती हा जुगार खेळते व पराभूत होते. लीलेची कहाणी यापेक्षा निराळी आहे. जयंताच्या जीवनाशी तिला एकरूप व्हायचे आहे. त्याआड इथे रूढी येत नाही, तर दोघांची सांस्कृतिक पातळी व कर्तव्याची जाणीव याच बाबी दोघांच्या मीलनाआड येतात. लीलेला पुनर्विवाह करता आला असता पण तिला जयंत हवा आहे. जयंतही तिला मिळाला असता पण मनोरमेच्या हक्कावर आक्रमण करून तिच्या दुःखाच्या पायावर स्वतःचे सुख उभारण्याइतका निर्लज्जपणा तिला करवत नाही. विवाहित जयंताचे विफल सांसारिक जीवन समोर असल्यामुळे तिच्या प्रीतीला एक प्रकारची धार आली आहे, पण तिने संयम सोडलेला नाही. लीलेवरील आपले प्रेम बंधुप्रेम आहे असे जयंत कितीही म्हणो, पण असल्या उदात्तीकरणाला विफल करणारे रोमांच त्याच्या शरीरावर उभे राहतातच. दोघांचेही जागृत मन या प्रीतीच्या उन्नयनासाठी झटत आहे; पण शरीराची तहान सारे यल फसवीत आहे. शरीराला मीलन हवे आहे तर संस्कृतीला अन्याय अपहार मान्य नाही. तुरुंगात लीला जयंताला भेटते. फासावर जाण्याची तयारी चालू असताना देखील परस्परांच्या मिठीचा मोह उभयतांना आवरता येत नाही. लवकर, फारच लवकर हे सुख सोडावे लागत आहे याची खंत जयंताला वाटते. मनाची साक्ष विरोधी जात असतानासुद्धा मृत्यूच्या सीमेवर असणारा जयंत लीलेच्या स्पर्शाला पुन्हा एकदा भगिनीचा स्पर्श म्हणतो व दुसरीकडे तिच्या ओठांचे दीर्घ चंबन घ्यावेसे वाटत असल्याचे सांगन आपण आपलीच वंचना प्रकट करतो. गडकरी जीवनाकडे या पातळीवरून पाहतात. एक होती विधवा; ती होती झरत; मध्ये आला समाज; तो तिने ओलांडला; मग त्यांचे झाले लग्न अशा प्रकारचे विकल्पन गडकऱ्यांच्या हातून घडत नाही. गडकऱ्यांच्या अभिव्यक्तीपद्धतीला कितीही दोष दिला तरी आशय म्हणून ज्याचे चित्रण ते करतात त्याला मानवी जीवनाची अपूर्णता हेच एकमेव उत्तर असते. 'पुण्यप्रभाव' असो की 'भावबंधन', वसुंधरा असो वा मालती- यांच्या प्रणयी जीवनाचे तपशील पाहिले की हा मेलोड्रामा नव्हे हे कळू लागते. फार्सच्या अगर

८२ / रंगविमर्श