पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उदा. मालतीने आपल्या कपाळीचे कुंकू काढून बहिणीचे कुंकू नीट करणे किंवा मनोरमेने चालत्या गाडीतून उडी टाकणे, तिचे तारेत अडकून पडणे आणि तरीही वाचणे. गडकयांच्या खलपात्रांना खलत्वासाठी अगर परिवर्तनासाठी पुरेशी कारणे नसतात. गडकऱ्यांची पात्रे जे विचार व्यक्त करतात त्यांना नेहमी कारणच असते असे नाही. लीलेच्या मृत्यूला कमलाकर कारणीभूत होतो, पण बाबासाहेब मात्र रुढीला शिव्या देतात. पात्रांच्या वर्तनालाही कारण असतेच असे नाही. द्रुमन आत्महत्या न करता दवाखान्यात जाऊन बाळंत होते. एवढे धैर्य दाखवणाऱ्या द्रुमनने मूल मारावे याचे कारण सांगता येत नाही. गडकऱ्यांची उपकथानके अनेक वेळेस मुख्य कथानकाशी ठिगळ जोडल्याप्रमाणे तर वाटतातच, पण काही वेळेला ती मुख्य कथानकाच्या हेतूच्या विरोधीही जातात. उदा. 'एकच प्याला' नाटकात भगीरथची दारू सुटते. 'प्रेमसंन्यासा'त रूढीविरुद्ध जाऊन प्रेमविवाह करणाऱ्या द्रमनला विफल व्हावे लागते. हा प्रसंग पाहन प्रेक्षकांचे मन पुनर्विवाहाला अनुकूल कसे होईल? दारुडेपणाचा कधीही पश्चात्ताप न होणारा तळीराम यांपैकीच एक आहे. गडकऱ्यांचे विनोदी नाट्यप्रवेश हे नाट्यहेतूच्या दृष्टीने अनेक वेळेला हेतूशून्य असतात. गडकऱ्यांच्या नाटकांतील कथानकेही अनेक वेळेस पायात कच्ची असतात. उदा. 'एकच प्याला'तील सुधाकर यशस्वी वकील असतो. यशस्वी वकिलाला न्यायालयात वागण्याची सवय असावी लागते. वकिलाला अधूनमधून कोर्टाकडून कानपिचक्या मिळतच असतात. तेव्हा यशस्वी वकील पण कोर्टात चिडणारा हे समीकरण जुळत नाही. हे आणि असे दोष गडकऱ्यांच्या सर्वच नाटकांत कमी-अधिक प्रमाणात भरपूर आहेत. खांडेकरांनी अत्यंत तपशिलाने ते मांडले आहेत. तरीपण किर्लोस्कर- देवलांना मागे सारून रंगभूमी पादाक्रांत करणे ही बाब सोपी नव्हे. गडकऱ्यांना हे यश साधले आहे.

वा. ल. कुलकर्णी यांचे आक्षेप'
  एकच प्याला'या नाटकाकडे वळण्याआधी वा. ल. कुलकर्णी यांच्या भूमिकेचा विचार केला पाहिजे. गडकरी अमक्याचे शिष्य, तमक्याचे वारसदार म्हणून आपल्या गुरूचे किती गुण बाळगतात, किती ठिकाणी परंपरेत भर घालतात, असल्या निरर्थक वादात वा. ल. पडत नाहीत. गडकऱ्यांच्या नाटकातील

नाटककार गडकरी : एक आकलन / ७९