पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोल्हटकरांपासून स्वतंत्र कथानकांना महत्त्व येते. या अगदीच सामान्य बाबीला त्या काळी फार महत्त्व मिळे. गडकऱ्यांनी 'राजसंन्यास' वगळता सारी कथानके स्वतंत्र घेतली. 'राजसंन्यास' नाटकाच्या कथानकात देखील ऐतिहासिक अंश फार थोडा आहे. कोल्हटकरांची कथानके गुंतागुंतीची असत. गडकऱ्यांनी ‘एकच प्याला' हे नाटक वजा जाता इतर नाटकांतून याच विशेषाचे अनुकरण केले आहे. कोल्हटकर मुख्य कथानकाला उपकथानकाची जोड देत. गडकऱ्यांनीही हा क्रम सर्वत्र चालू ठेवला. विनोदाला कोल्हटकरांनी स्वतंत्र स्थान दिले. गडकऱ्यांनीही त्याचेच अनुकरण केले. कोल्हटकर संगीताचे मर्मज्ञ होते. त्यांनी नाट्यसंगीतात चालींचे नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला. गडकऱ्यांना संगीत फारसे कळत नव्हते. त्यामुळे त्यांचा नाइलाज झाला; पण उर्दू चाली निवडण्याचा प्रयत्न त्यांनीही मोठ्या प्रमाणात केला. कोल्हटकरांना फारशी नाट्यदृष्टी नव्हती. कादंबरीप्रमाणे त्यांच्या नाटकांतील काही प्रवेशांचे कार्य कथानकाचे निवेदन करणे इतकेच असे. दुर्दैवाने गडकऱ्यांनीही याचेच अनुकरण केले. कुठेतरी सामाजिक सुधारणा आणल्याशिवाय कोल्हटकरांना चैन पडत नसे. गडकऱ्यांनीही कारण-अकारण रुढींना शिव्या मोजल्या आहेतच. कोल्हटकरांची चिंतनपद्धती जीवनविन्मुख होती. खांडेकरांनी याचे एके ठिकाणी असे वर्णन केले आहे, 'सीतेने धनुर्भगाचा पण लावीला कारण तिच्या भिवया धनुष्याकृती होत्या. द्रौपदी मीनाक्षी म्हणून तिचा पण मत्स्यभेदाचा होता. या परंपरेप्रमाणे मदिरेचा निषेध करणारी कोल्हटकरांची नायिका त्यांनी मदिराक्षी कल्पिली आहे.' गडकऱ्यांनी सिंधूचे डोळे मदिरधुंद न ठरवता वत्सल उरू दिले, याबद्दल मराठी वाचकांनी कृतज्ञच राहिले पाहिजे. कोल्हटकरांना आपली नाटके सुखान्त करण्याचा नाद होता. गडकऱ्यांची सुखान्त नाटके सुद्धा व्यथांनी इतकी व्याप्त आहेत की त्या नाटकांचा सुखी शेवट हा कधीच समाधान देणारा असत नाही. गडकऱ्यांनी हा मोह टाळला आहे. या दोन बाबी सोडल्यास कोल्हटकरांचे अनुकरण ही बाब गडकऱ्यांची हौस अगर लकब नाही तर ते अनावर विनाशकारी व्यसन झाले आहे. कोल्हटकरांनी राजाची राणी पुरुषवेष धारण करून राजाजवळ राहते, पण ओळखली जात नाही असे दाखविले आहे. आधीच त्या काळी स्त्रीपार्टीची कामे पुरुष करीत. त्यात हे वेषांतर. गडकयांनी लतिकेचा प्रियकर स्त्री न होता पुरुष म्हणून तिच्याच घरी राहतो, फक्त वेष

७६ / रंगविमर्श