पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिला भाण
 पहिला भाण एका कल्पनेपासूनच आरंभ पावतो. घरी जाताच पत्नी तुमच्याशी भांडेल, तुम्हाला शिव्या देईल असा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद नीट समजून घेतला पाहिजे. तुम्हाला घर असेल, संसार असेल, पत्नी असेल. हे नसले तर मग भांडणार कोण? बरे, पत्नी सत्शील नसेल तर ती भांडणार नाही. तिने त्याग केला तरी भांडण होणार नाही. सत्शील, सांभाळून घेणारी, पण भांडणारी पत्नी हा घटकही जीवनात कायम राहील आणि नित्य नवा आनंद देणारा बाहेरख्यालीपणाही चाल राहील. असा हा आशीर्वाद आहे. माझ्यासारखे सुखी निर्लज्ज व्हा. माझ्यापेक्षा सांपत्तिक स्थिती चांगली राहो, असा याचा अर्थ आहे. या भाणातील विट एक भांडण मिटविण्यासाठी बाहेर पडलेला आहे. भांडणाचे कारण काय? तर कुबेरदत्त याची ‘प्रेयसी' नारायणदत्ता नावाची गणिका आहे. ही जोडी जुळवून देणारा मध्यस्थ हाच विट होता. कुबेरदत्ताने मदनसेना या गणिकेचे कौतुक केले म्हणून नारायणदत्ता भांडलेली आहे. नारायणदत्तेला भांडण करणेच भाग आहे. नाही तर हातचे गिहाईक जाईल. मदनसेना तर हे नवे गि-हाईक गाठण्यास उत्सुक आहेच. नृत्य-संगीताचे प्रयोग पाहण्यासं येणारे रसिक केवळ कला पाहण्यासाठी येत नसत. नवी पात्रे शोधणे हाही एक उद्देश असे. आणि गणिकासुद्धा या कार्यक्रमातून प्रसिद्धी व प्रदर्शन या आधारे अधिक पैसा देणारे 'प्रियकर' गाठण्याची धडपड करीत. भांडणाचे कारण ही नित्य असणारी स्पर्धा हे आहे. नाटकाच्या प्रारंभी असणारी भांडणाची सूचना आणि हे भांडण याचा असा संबंध आहे.
 या भांडणाचा शेवट ठरलेला आहे. नारायणदत्ता रागारागाने निघून गेली, पण हा रुसवा फार काळ टिकवणे तिला परवडणार नाही. कुणीही मनधरणी न केली तरी अभिसार करून नारायणदत्ता आपल्या प्रियकराकडे येणारच. इतक्या साध्या बाबीसाठी ती गिहाईक गमवणार नाही आणि विट तत्परतेने रुसवा काढणार. तो जोडी फुटू देणार नाही. जमविलेल्या जोड्या फुटू देणे हे त्यालाही हानिकारक आहे. कुबेरदत्ताला मदनसेना मिळाली असती तर प्रश्न वेगळा होता. मदनसेना उपलब्ध होती, पण अजून सारे व्यवहार ठरायला हवेत. या जगात डोळा भिडवून आमंत्रण तर प्रत्येक गणिकाच देणार. कुबेरदत्त नारायणदत्ता

२७० / रंगविमर्श