पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि मनाच्या वेदना व व्याधी झाकून ठेवून तिला हसणे भाग आहे. जन्मभर हे शरीर भोगण्यासाठी भाड्याने ती देत असते. सामान्यपणे वेश्यांचा शेवट व अंत हिंसाचारात होतो. जुन्या मध्ययुगीन युगात गुलामाची हत्या ही नित्य बाब होती. वेश्यांची विविध प्रकारची हत्या हीसुद्धा नेहमीची बाब होती.
मुलींची जाहिरात
 गणिका आणि गिहाईक यांना जोडणारा दुवा हा या जगाचा एक भाग आहे, पण याखेरीज नव्याने तारुण्यात येऊन धंद्याला लागणाऱ्या मुलींची जाहिरात हाही एक भाग आहे. नटूनथटून रस्त्याने मिरविणे, नाट्य-संगीतात काम करणे, घरासमोर कंदूकक्रीडा करणे हे सारे आपला 'माल' प्रदर्शनात आकर्षकपणे ठेवण्याचे प्रकार आहेत. या मुद्द्याबाबत गैरसमज झाला म्हणजे गणिकांचे जग वैभव, विलास आणि हास्य यांनी भरलेले वाटते. खरे म्हणजे ते जग असुरक्षितता-वेदना-फसवणूक-अत्याचार यांनी भरलेले जग आहे.
 या वेशवस्तीच्या गरजा त्या वस्तीला आकार देतात. वेशवस्तीचा मद्यपानाशी निकट संबंध असतो. त्यामुळे आसवांची पुषकळशी दुकाने या वस्तीत असतात. हे जुने दारूचे अड्डे. या मद्यपान गृहाजवळच द्यूत खेळण्याची म्हणजेच जुव्वा खेळण्याची सोय असते. फुलांच्या माळा तयार करणे, सुगंधी द्रव्ये, अंगाला लावण्याची उटणी आणि पौरुष वाढविणारी औषधे, या क्षेत्रातले वैद्य, तमासगीर, कोल्हाटी, कसरतीचे व जादूचे प्रयोग करणारे असाही एक पसारा असतो. बकऱ्यांच्या आणि कोंबड्यांच्या झुंजी लावून त्या पाहणे हा त्या काळच्या करमणुकीचा एक प्रमुख भाग आहे. मद्य, मदिराक्षी, छूत, शृंगार आणि शक्तिवर्धके यांनी वेढलेले अनेक व्यवसाय वेशवस्तीत नांदत असतात. नपुसक आणि त्यांचे विविध प्रकार हा या जगाचा कायम भाग आहे. वासनेला एक विकृतीचा पदर असतो. नपुसक हे या विकृत वासनेच्या पूर्तीचे साधन असते. या साऱ्या संमिश्र जगाचे काही चित्र या भाणांच्या मधून आपण पाहू शकतो.
विदूषक-गणिकामाता
 या साऱ्या चित्रात अजून दोघांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांपैकी एक नाव विदूषकाचे आहे. विदूषक हा राजे असणाऱ्या नाटकांतून राजाचा मित्र म्हणून

चतुर्भाणी बावनखणी / २६५