पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विटाचे आवश्यक गुण
 गिहाईके गाठणे या कल्पनेतच इतरांची गिहाईके फोडणे समाविष्ट आहे. एका गणिकेचा प्रचार करण्यातच इतरांची निंदा येते. गणिकेजवळ आपल्या गि-हाइकाची स्तुती करताना इतर गि-हाइकांची निंदा करावी लागणारच म्हणून सफाईने खोटे बोलणे विटासाठी फार आवश्यक असते. सर्व गणिकांशी ओळखी असणे, त्या टिकविणे, वाढविणे विटांना भागच आहे. फराळ, जेवण, दारू, कपडे, फुकट भोग आणि बिदागी यासाठी सर्व गणिकांशी विनोद करणे, हसून बोलणे हे त्याचे काम आहे. गणिकांनाही विटाची गरज असते. विट म्हणजे फुकट भोग हे जाणूनही विटांशी मैत्री करणे गणिकांना दोन कारणांच्यासाठी भाग असते. प्रथम म्हणजे इतरांच्या गुंडगिरीपासून रक्षण, विटांच्या गुंडगिरीपासून रक्षण, दुसरे म्हणजे गिहाइकांचा शोध, म्हणून विटांची गणिका-मैत्री व गणिकांची विटमैत्री हा दोघांच्याही गरजेचा भाग आहे. ही मैत्री नव्हे, हा धंदा आहे. धंद्याची गरज ही वेशवसतीत मैत्रीचा आधार असते.
मूलदेव
 या भाणांच्यामध्येच मूलदेव हा नायक मिळविण्यासाठी विपुलेचा विट आणि दुसरा विट यांच्यामध्ये चालू असणारा संघर्ष पाहता येईल. देवदत्ता ही मूलदेवाकडे आहेच. तिची लहान बहीण देवसेना आणि मूलदेव यांचे संधान जुळविण्याचा प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या बाजूने हा मूलदेव विपूलेसाठी मिळविण्याचे यत्न चालू आहेत. गि-हाईकांच्या वतीने गणिका मिळवितानाही फसवणूक, फोडाफोडी होणारच. हास्य, विनोद, नृत्य, गीत, सजणे या वरवर दिसणाऱ्या बाबींच्या मागे स्पर्धा, निंदा, हेवे-दावे यांचा वावर सतत असतो. हे चालू असताना फसवणूक हा एक मोठाच भाग आहे. गिहाईके वेश्यांची विविध प्रकारे फसवणूक करतात, विटही करतात. वेश्या तर फसवणूक करतातच. परस्परांना फसवण्याचे सारे प्रयत्न, रंजनाचे प्रयत्न आणि खोटे अभिनय यांनी भरलेले हे जग आहे. या जगात गुंडगिरी आणि मारामाऱ्या असणारच. गरुड पुराणात असे म्हटले आहे की, वेश्या ही नित्य पराधीन असते. झोपेच्या बाबतसुद्धा ती स्वतंत्र नसते. गिहाईकाला दारूच्या नशेत ठेवणे व स्वतः बेसावध न होता दारू पिणे हे काम करणारे ते हसणारे यंत्र आहे. शरीराच्या

२६४ / रंगविमर्श