पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भाणांच्या मधून घेऊ तिचा परीघ १५ टक्के समाजाचा आहे.
महानगरांची संस्कृती
 या महानगरांच्या वैभवाचे मुळ उरलेल्या जनतेच्या शोषणात असते. या उरलेल्यांना फक्त उत्पादक श्रम व सेवादास्याचे 'कर्तव्य' आहे, बाकी कोणतेही हक्क' नाहीत. हे ध्यानात ठेवन आपण वैभवसमृद्ध शहरांच्याकडे वळले पाहिजे. प्रामख्याने ही शहरे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वरिष्ठ वर्णाची ३०-३५ टक्के लोकसंख्या आणि मग निरनिराळ्या प्रकारचे सेवक, दास, मजूर या शूद्रांची ६५ ते ७० टक्के लोकसंख्या अशी आहेत. अर्थात ही टक्केवारी स्थूलमानाने समजावयाची. ती नेमकी व काटेकोर नाही. राज्यामधील सर्वांत मोठा जमीनदार स्वतः राजाच असे. या राजाचे विविध अधिकारी, मंत्री, सरदार यांच्या जमीनदाऱ्या असत. वैभवशाली शहरांच्यामध्ये असणाऱ्या सत्तावान श्रीमंतांचा हा वर्ग म्हणायचा. मोठ्या प्रमाणात हा वर्ग ब्राह्मण व क्षत्रियांच्या मधून असे. देशभर फिरणारे व्यापारी तांडे, परदेश व्यापार आणि त्यासाठी लागणारा कच्चा व पक्का माल हाताळणारे मोठमोठाले व्यापारी हा फारशी सत्ता हाती नसणारा, पण फार मोठी अप्रत्यक्ष सत्ता असणारा व्यापारी वर्ग होता. या ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्यांचे वैभवशाली जीवन मोठमोठ्या नगरांच्यामधून दिसे. गुप्तकालातील पाटलीपुत्र आणि उज्जैन ही अशी महानगरे आहेत. प्राचीन चारही भाण या महानगरांच्यामध्ये घडलेले कथानक सांगतात.
गणिकांची वस्ती
 हया महानगरीचा एक भाग वेश असे. वेश्या हा शब्द या 'वेश' शब्दावरून बनलेला आहे. वेश वस्तीत राहणाऱ्या वेश्या गणिका, रूपाजीवा, वेश्या अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या स्त्रियांची एक वेगळी वस्ती शहरांमध्ये असे. ही वस्ती म्हणजे वेश. त्या समाजरचनेने समाजाचा एक भागच या वस्तीसाठी राखीव ठेवलेला असे. या समाजातील स्त्रिया वंशपरंपरा शरीरविक्रयाचा प्रमुख धंदा करीत. या समाजात आई आणि तिची मुलगी या मातृपरंपरेला सर्वांत मोठे महत्त्व होते. पुरुषांना फारसे महत्त्व नसे. वाद्यवादन आणि छोट्याछोट्या नोक-या यापेक्षा पुरुषांना इथे जास्त महत्त्व नाही. आपण हा सगळा समाज गणिका या नावाने गृहित धरू. या समाजात देशोदेशी खरेदी

२६० / रंगविमर्श