पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१.कणाद नित्यपदार्थवादी तत्त्वज्ञ आहे. २२. द्रव्य, गुण, कर्म, समवाय, भेद, विशेष हे पदार्थ कणाद मानतात. ते मोक्षवादी व योगशास्त्राचे उपासक आहेत. २३. बाईला रजोगुण (विटाळ) असतो. तिला लेप होतो. पुरुषाला काय? फक्त शेत जाणणारा तो असतो असा फटकारा. २४.गमन शब्द व्यर्थी आहे. २५.विटाळ गेलेली.लोकभाषेतील शब्द. २६.गुलाल भरणे- धंद्याला लावणे.लोकभाषा. २७.त्याग करणे- लोकभाषेतील शब्द. २८.पली ही गल्लीबोळ,गणिका हा राजमार्ग.त्या रस्त्यावर जाणाऱ्यांशी भांडणारी. २९.लुबाडला गेल्यामुळे भिकारी झाला. ३०.मूळ शब्द 'पणित' असा आहे.अगाऊ रक्कम हा अर्थ. ३१.या साऱ्यांचा तपशील भरतनाट्यशास्त्रात आहे. ३२.निषाद आणि षड्ज ह्यांमधील स्वर. ३३.चाकर गणिकेला आज्जुका म्हणत. २५०/ रंगविमर्श