पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हीच मेखला मिरवणारी गुणवती पृथ्वी, हया सहवासात नरेन्द्रही सुखी होवो.
(विट जातो.)
टीपा:
 १.हा वररुची गुप्तकालीन आहे.प्रियकर-प्रेयसी दोघेही एकमेकांस भेटण्यास निघाले,हा भाणाच्या नावाचा अर्थ.

२. प्रेयसीने ईर्ष्यावश कलह करावा हे भाग्याचे लक्षण असा संकेत आहे. भाणात नेहमी

गणिका ही प्रेयसी असते.

३.लोधवृक्ष हेमंतात बहरतो.
४.हे मित्रकार्य म्हणजे गणिका गाठून देणे.
५.गणिका दूतीकडून निरोप पाठवून मीलनाचे संकेत ठरवीत.
६. गणिकांची नावे नेहमी दत्ता, सेना अशी असतात. आपण व्यापाऱ्यांच्या, सरदारांच्या कन्या आहो असा भाव नावामुळे सुचविला जातो.

७.गणिकांच्या वस्तीत अचलपणे राहिलेला,तेथे स्थिर झालेला असा नावाचा अर्थ आहे.

८.विट हे विलासी जीवनात मुरलेले असतात. 

९.विटाच्या बाहेरख्यालीपणाच्या.

१०.गणिकांना खूप पैसे देणारा.
११. वयात आलेल्या, पण अजून धंद्याला न लागलेल्यांना दारिका म्हणतात. लोकभाषेत

त्यांना फुलवा व व्यवसाय सुरू झाला की झुलवा म्हणतात.

१२. संस्कृत नाटकाला स्थलैक्याचे बंधन नसते. परिक्रमा म्हणजे स्थळ बदलले हा

नाट्य-संकेत.
१३.इतर गणिकांशी संबंध नसलेला.पत्नी गणतीत नसते; कारण ती प्रासादात अडकलेली.

१४. गणिकावस्तीचे वैभव.

१५.व्यवहार ठरविणाऱ्या कुट्टिनी.या गणिकेची आई,मावशी अगर पालक असत.आपण प्रेमाच्या भुकेल्या,पण आई मोठी लोभी.तिची आज्ञा तर पाळणे भाग असा अभिनय गणिका करीत.मराठी लोकभाषेत काकू.
१६.झुलवा-व्यवसायातील गणिका.
१७.आवडते हेच धनवान असले की व्यवहाराचा रस्ता मोकळा झाला.
१८.म्हणजे मनोरंजन नाही. हसणे म्हणजे विनोद नव्हे.
१९. गणिका हा ध्वनी.
२०. मला गणिकावस्तीत स्थिर असणारा नको; कणादमुनीच्या वैशेषिक शास्त्राचा ज्ञाता हवा.कारण मी कणादानुयायी आहे असा अर्थ.

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण / २४९