पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 'स्वच्छ चंद्र पाहून आणि कोकिळकूजन ऐकूनही जी प्रियकराची मनधरणी करीत नाही तिचे जीवन व्यर्थ आहे.'
 त्या गीताने मन शिथिल झालेल्या तुझ्या स्वामिनीने प्रियकराला संदेश पाठविला आणि त्याच्या आगमनाची वाट न पाहता स्वतःच भेटीसाठी निघाली आणि वसंताच्या फुसलावणीने अधीर होऊन स्वामीही तिकडून निघाले तो त्यांची भेट वीणाचार्य विश्वावसुदत्त याय च्या दारासमोर झाली?
 त्या बिनसलेल्या जोडप्याला वीणाचार्यांनी घरात बोलावले? सकाळी आज्जुका ३३ म्हणाली, “सखे जा, महाराज वैशिकाचलाला बोलावून आण." तेव्हा चलावे महाराज.
 छान ! छान ! कनकलते, तू मोठी शुभवार्ता दिलीस. तुझे यौवन स्थिर असो. प्रियकराची प्रियतमा हो. तुला सतत इच्छित भोग प्राप्त होवोत. तू पुढे हो. (परिक्रमा) चला, घरात घुसू.
 अरे, घाबरू नका. जोडी पक्की व स्थिर असो. वसंतऋतूने तुमचा पुन्हा संयोग केला. तसा हा ऋतू सर्वांचा संयोग करो. अहो, या वसंताने मलाही ठकविले. आता मला काय काम उरले? माझ्या साह्याविनाच तुम्ही एकत्र आलात.
 आणि यात वसंताचा तरी काय दोष? सुंदर उद्याने, चांदण्या रात्री, सुस्वर वीणा, दूती, गोष्टी, कुतूहलाने भरलेले संवाद हे सारे असले तरी बिनसलेल्यांचे जुळतेच असे नाही. परस्परांचे खरेखुरे गुण, त्यांची ओळख पटली म्हणजे निर्माण होणारे उत्कट प्रेम हेच मीलनाचे खरे कारण.
 काय म्हणतेस? नारायणदत्ते, तुमची प्रीतीच मी प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली आहे? म्हणून मीच या संयोगाला कारण आहे ?
 असो. रतीच्या तान्हेल्या जोडप्याशी फार वेळ गप्पा मारणे बरे नाही. सारे पाटलीपुत्र या वेळी ज्या सौख्याचा अनुभव घेत आहे, त्याचे वर्णन कामीजनांचेही केवळ शब्द कसे करू शकतील?
 फुललेल्या कमळांनी फुललेला, मधुर मादक बोल बोलणारा आणि पाझरत्या चारुतेने भरलेला प्रियेचा चेहरा पाहून जसा तू उल्हसित आहेस त्याचप्रमाणे-
 धान्यांनी फुललेली, मेरू आणि विंध्य हे पुष्ट स्तन धारण करणारी, समुद्र

२४८/ रंगविमर्श