पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उद्विग्न. बिचारी अजून कच्ची आहे. चला, आपणही चलू. (परिक्रमा)
 अरे, ही संन्यासिनी विलासकौण्डिनी, नखऱ्याने ठुमकत येत आहे. हिचे अपरूप लावण्य म्हणजे डोळ्यांना अमृतच. पागल भुंगे मोहरलेले ११ आंबे सोडून हिच्या सुवासिक पदराभोवती गुंजारव करीत आहेत. थोडे हिच्याशी बोलून कान व डोळ्यांचे पारणे फेडू.
 देवी भगवती, मी वैशिकाचल आपणास प्रणाम करतो. काय म्हणता? मला वैशिकाचल नको, वैशेषिकाचलाची २° गरज आहे? तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
 विशाल व चंचल डोळे भिरभिरत आहेत. रतिश्रमाने गाल म्लान व तांबूस दिसत आहेत. चालीत आळस, ओठावर मुरका.हे सुभगे,तुझ्या प्रियकराने रति हाच नित्यपदार्थ२१असल्याचा धडा विवरणपूर्वक शिकविलेला दिसतो.
 काय म्हणता? “पापी कामदासा, तुला जग तुझ्यासारखे दिसत आहे ?" छे ! छे ! सुभगे, धन्य आहेत ते दास, ज्यांना तुझ्या चरणसेवेचे भाग्य मिळाले. वरतन, ते भाग्य आमच्यासारख्या पाप्यांना कसे मिळणार?
 काय म्हणता? षट् २२ पदार्थाचे ज्ञान नसणाऱ्याशी संभाषण करण्यास गुरुजींची मनाई आहे ? भगवती, आज्ञा तर योग्य आहे, पण जागा चुकली. कारण हे विशालाक्षी, मी षट् पदार्थाचा जाणता आहे. तुझे शरीर हेच द्रव्य, तुझे रूपादी हेच गुण. तरुणाशी चालू असणारी तुझी गती हेच कर्म. लोक तुझ्याशी समवाय चाहतात. इतरांच्यापेक्षा तुझ्या चवीत भेद आहे. आवडेल त्याचा भोग, नको असेल त्याच्यापासून मोक्ष. दोन्हींत तू चतुर आहेस.
 अरे ! हिने फक्त तुच्छ हसूनच प्रत्युत्तर दिले. काय म्हणता? सांख्यमतानुसार पुरुष २३ निर्गुण, अलेप आणि क्षेत्रज्ञ असतो? वाहवा ! आपण तर माझे तोंडच बंद केले. बोलता बोलता आपण पुन्हा आतुर झाल्यासारख्या दिसता. आपण गमन २" करावे. तरुणांच्या रतीत विघ्न नको. मीही चलतो. (परिक्रमा)
 अरे, ही चरणदासीची आई रामसेना, वयस्क असूनही अजून नवतरुणीसारखी लचकत येत आहे. तारुण्यात सर्व भोग भोगून आपल्या प्रियकराचे द्रव्य हरण करून, तरुणपणी तरुणांच्या आपापसातील मारठोकीचे कारण बनून कृतकृत्य झालेली ही, हिला पुन्हा विस्मय कशाचा वाटला?

दिवाकरांची नाट्यछटा आणि तिचे प्राचीन रूप : भाण/ २४३