पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हाय ! तरुण कामीजनांचे मरणच अशी ही घाटीपार २५ प्रौढा, आता मुलींच्या प्रियकरांचे द्रव्य दोहन करण्यासाठी जात आहे. या वठलेल्या नखऱ्याची थोडी चाचपणी करू या.
 कामीजनांच्या महावज्राला नमन असो. हे अल्लडे ! रामसेने ! आपल्या पोरीला गलाल ६ भरून झाल्यानंतर आता कणाचे घरटे उजाड करण्यासाठी जात आहेस?
 काय म्हणतेस, माझेच चरित्र मला छळीत आहे? सोड ही थापेबाजी. नेम कुणावर धरला तेवढे सांग. काय म्हणतेस? तुझी पोरगी चरणदासी जी धनिकांच्या घरी गेली ती तेथेच राहिली आहे ? तिला संगीतकाच्या निमित्ताने परत आणावयाचे आहे ? अग, तुला खरे सांगू? ही पोरीची गफलत आहे. कामुकांची सर्वप्रकारे पिळवणूक करणाऱ्या व सार चोखून चोयटी कुशलपणे फेकणाऱ्या चतुर आईची ती लेक आणि ती शास्त्रात इतकी अधू असावी ना?
 एकदा जो गमनभोग्य होता, त्याचा साठा उपसून घ्यावा व सुट्टी २० सांगावी, हे सोडून रुतून बसली; त्याच्या रितेपणात फसली. अशा पोरीला शास्त्र तरी काय शिकवावे?
 काय म्हणतेस? मी चरणदासीला उपदेश करू? ठीक आहे, पण थोडा मित्रकार्यात गुंतलो आहे. ते आटोपून येतो. आता तू जा. (परिक्रमा)
 खरोखर वेश्या कधी भरवशाच्या नसतात. या निर्दय आणि लोभी वारांगना, आत्मा जसा शरीर सोडतो, त्याप्रमाणे सार संपल्यावर जुना यार सोडतात; आणि काकू, या संकटावर औषध नाही; गणिकारूपी शस्त्र वापरण्यात कुशल असणाऱ्या या घाटीपार मातांचा ईश्वर सत्यानाश करो.
 अरे, आले. न टळणारे संकट अकल्पित आले. ही राजमार्गातील २८ कलहिनी नावाची सुकुमारिका, नपुसका इकडे कोठे येत आहे ? चला, तोंडावर उपरणे घेऊन झटका. पण हाय ! ही माझ्याकडे येत आहे. काय होणार माझे ? बापा यमराजा, तुला डुलकी आली काय?
 काय म्हणतेस, सुकुमारिके? प्रणाम करतेस? पोरी, अविधवा व बहुपुत्रा
 भुवयांचा नाच, डोळ्यांचे फडफडणे, ओठांचे मुरडणे, हातवारे आणि लचकणे. अरे ! स्त्रिया तर तुझ्या फार मागे पडल्या. अग, ही तुझी विखुरलेली

२४४ / रंगविमर्श