पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐतिहासिक व्यक्तींच्या जीवनातील घटनात्मक सत्याला बांधून घेण्याची नाटककाराची इच्छा नाही. म्हणून नाटककाराने याची काळजी घेतलेली आहे की, भानू हे कै. कर्वे मानता येऊ नयेत. या दृष्टीने ऐतिहासिक सत्याशी उघड दिसणारा फरक हा की, महर्षी कर्वे आपली शताब्दी पाहून पूर्ण शंभर वर्षे जगून त्यानंतरची काही वर्षे पाहून नंतर वारले. शेवटच्या काही वर्षांत जवळपास कर्त्यांना अर्धवट स्मृतिभ्रंश झालेला होता, पण त्यांना पक्षघात कधी झालेला नव्हता आणि आनंदीबाई कर्वे महर्षी कर्त्यांच्या आधी सुमारे वीस वर्षे वारलेल्या होत्या. या नाटकातील शेवटच्या अंकातील प्रवेश कर्त्यांच्या जीवनात घडूच शकत नाही.
  प्रो. भानूंना लो. टिळकांच्याविषयी विशेष आस्था असल्याचे दिसते. लोकमान्यांचे असे म्हणणे होते असे भानू मुद्दाम सांगतात. महर्षी कर्वे आणि टिळक यांचा असा संबंध कधीच नव्हता. केसरीच्या पाठिंब्याची एका मर्यादेपलीकडे जाऊन त्यांनी कधीच पत्रास बाळगली नव्हती. या नाटकात कर्मयोगी कार्यकर्त्यांचा मठ स्थापन करण्याची कल्पना आलेली आहे. ही कल्पनासुद्धा कर्वे यांची नसून ती हरिभाऊंच्या कादंबरीतील कल्पना आहे. प्रत्यक्ष जीवनात अशी कल्पना कै. गोखल्यांच्या मनात होती. बयोच्या बाबतीत तर आनंदीबाई आणि बयो यांच्यात खूपच फरक आहे, असे दाखवता येईल. या घटनांच्याकडे बोट दाखवून नाटककार सरळच हे म्हणू शकतो की, प्रो. भानू म्हणजे महर्षी कर्वे नव्हेत.
  आणि प्रो. भानू हे महर्षी कर्वे आहेत हे सर्वांना माहीत आहे. या खात्रीमुळेच नाटककाराने चिठ्या डकवू नका अशी मुद्दाम विनंती केली आहे. प्रो. भानूंच्या निमित्ताने कर्त्यांची व्यक्तिरेखा उभी आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. चार-दोन घटना असलेल्या नसलेल्या त्यात घातल्या अगर काढल्या काय, जे व्यक्तिमत्त्व उभे आहे ते कर्त्यांचेच आहे. फार तर आपण असे म्हणू की, सगळ्याच घटना कर्त्यांच्या जीवनातील नाहीत, पण ह्या घटना कर्त्यांच्या जीवनात घडल्या असल्या तर ते असेच वागले असते. नाटककाराने बयोची व्यक्तिरेखा मूळ आनंदीबाईपेक्षा अधिक भव्य घेतलेली आहे. महर्षी कर्त्यांची व्यक्तिरेखा एका ऐन गाभ्याच्या ठिकाणी मुळापेक्षा थोडी हलकी झाली आहे व त्यामुळे ती जास्त मानवी झालेली आहे. आपण महान श्रमाने उभ्या केलेल्या

१५० / रंगविमर्श