पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कथा रंगभूमीवर सदैव वावरतच आल्या आहेत. उलट कमी दर्जाच्या नाटककारांना कोणतीच क्षमता जवळ नसताना या कथांचा आधार जास्त वाटत आला आहे.
  जे पुराणकथांच्या विषयी म्हणता येईल तेच ऐतिहासिक कथांच्याविषयी म्हणता येईल. शिवाजी, संभाजी आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेक जण यांच्या कथा नाटकांचा भाग कमी वेळा झाल्या नाहीत. थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स इथपासून ही परंपरा सुरू होते, ती न संपता आजपर्यंत चालू आहे. या ऐतिहासिक कथांच्या बरोबर अलीकडील राजकारणाने ज्यांना नायकत्व दिले आहे असे थोर नेते हेही नाटकांचे विषय होतात. ज्ञानेश्वर-तुकारामादी साधुसंत यांच्याही जीवनाशी नाटककार थोडा खेळ खेळलेले नाहीत. एका अर्थाने ह्या सगळ्याच असामान्य पुरुषांच्या जीवनकथा आहेत. संख्येच्या दृष्टीने पाहिले तर ह्या असामान्य पुरुषांच्या जीवनकथा नाटकांचा भाग झालेल्या आहेत. ही संख्या सामान्यांच्या कथांच्यापेक्षा जास्त ठरण्याची शक्यता आहे.

नाटकाचा नायक
 नाटकाचा नायक प्रख्यात उदात्त पुरुष असावा ही प्राचीनांचीच भूमिका आहे. त्यामुळे परवापर्यंत प्रख्यात कथा बिनधोकपणे निवडल्या जात होत्या. कथानकातील व्यक्तिरेखन, घटनांच्यामधील नाट्य, संवादांच्या मधील जिवंतपणा, सर्व बाबींच्याकडे दुर्लक्ष करून प्रख्यात नायकांच्या कथा नाटककार निवडीतच आले. कलात्मक व्यवहाराच्या संदर्भात हा पसारा केवळ नोंद घेऊन बाहेर सारण्याच्या लायकीचा आहे. ह्या पुढचा टप्पा खाडिलकरांच्या नाटकांच्या मधून आपल्याला दिसतो. खाडिलकरांना उग्रतेची आणि भव्यतेची एक ओढ होती. त्यांच्याजवळ उग्र-भव्य व्यक्तिदर्शनाचे सामर्थ्यही होते. खाडिलकरांचा पौराणिक नाटकांच्यामधील शुक्राचार्य अगर कृष्ण किंवा ऐतिहासिक नाटकांच्या मधील रामशास्त्री अगर राघोबा ही प्रख्यात पुरुषाचे नाव घेऊन उभालेली रंजन सामुग्री नसे. खाडिलकरांच्या नाटकातील बोधवाद जरी सोडला तरी ही नाटके ज्या पद्धतीने इतिहास-पुराणांच्याकडे जात आहेत, ती पद्धती नाट्यकलेचा विचार करणारांना गंभीरपणे समजून घेणे भाग आहे. खाडिलकरांच्या ऐतिहासिक, कथा रंगभूमीवर सदैव वावरतच आल्या आहेत. उलट कमी दर्जाच्या नाटककारांना कोणतीच क्षमता जवळ नसताना या कथांचा आधार जास्त वाटत आला आहे.
  जे पुराणकथांच्या विषयी म्हणता येईल तेच ऐतिहासिक कथांच्याविषयी म्हणता येईल. शिवाजी, संभाजी आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेक जण यांच्या कथा नाटकांचा भाग कमी वेळा झाल्या नाहीत. थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूचा फार्स इथपासून ही परंपरा सुरू होते, ती न संपता आजपर्यंत चालू आहे. या ऐतिहासिक कथांच्या बरोबर अलीकडील राजकारणाने ज्यांना नायकत्व दिले आहे असे थोर नेते हेही नाटकांचे विषय होतात. ज्ञानेश्वर-तुकारामादी साधुसंत यांच्याही जीवनाशी नाटककार थोडा खेळ खेळलेले नाहीत. एका अर्थाने ह्या सगळ्याच असामान्य पुरुषांच्या जीवनकथा आहेत. संख्येच्या दृष्टीने पाहिले तर ह्या असामान्य पुरुषांच्या जीवनकथा नाटकांचा भाग झालेल्या आहेत. ही संख्या सामान्यांच्या कथांच्यापेक्षा जास्त ठरण्याची शक्यता आहे.

नाटकाचा नायक
 नाटकाचा नायक प्रख्यात उदात्त पुरुष असावा ही प्राचीनांचीच भूमिका आहे. त्यामुळे परवापर्यंत प्रख्यात कथा बिनधोकपणे निवडल्या जात होत्या. कथानकातील व्यक्तिरेखन, घटनांच्यामधील नाट्य, संवादांच्या मधील जिवंतपणा, सर्व बाबींच्याकडे दुर्लक्ष करून प्रख्यात नायकांच्या कथा नाटककार निवडीतच आले. कलात्मक व्यवहाराच्या संदर्भात हा पसारा केवळ नोंद घेऊन बाहेर सारण्याच्या लायकीचा आहे. ह्या पुढचा टप्पा खाडिलकरांच्या नाटकांच्या मधून आपल्याला दिसतो. खाडिलकरांना उग्रतेची आणि भव्यतेची एक ओढ होती. त्यांच्याजवळ उग्र-भव्य व्यक्तिदर्शनाचे सामर्थ्यही होते. खाडिलकरांचा पौराणिक नाटकांच्यामधील शुक्राचार्य अगर कृष्ण किंवा ऐतिहासिक नाटकांच्या मधील रामशास्त्री अगर राघोबा ही प्रख्यात पुरुषाचे नाव घेऊन उभालेली रंजन सामुग्री नसे. खाडिलकरांच्या नाटकातील बोधवाद जरी सोडला तरी ही नाटके ज्या पद्धतीने इतिहास-पुराणांच्याकडे जात आहेत, ती पद्धती नाट्यकलेचा विचार करणारांना गंभीरपणे समजून घेणे भाग आहे. खाडिलकरांच्या ऐतिहासिक,

हिमालयाची सावली/१३७