पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तींचा संघर्ष सांगत नाही, म्हणून रूढ अर्थाने ह्या नाटकात नायक नाही, खलनायक नाही असे माझे म्हणणे आहे. एखादी परिचितासारखी दिसणारी आणि आकर्षित वस्तू समोर आल्याच्यानंतर ती आगळी आणि अनोळखी अशी विलक्षण वस्तू समोर आहे हे भानच आपण हरवावे असा प्रकार याबाबत झाला आहे. अनोळखी विलक्षणाला जेव्हा परिचित मोजपट्ट्या अपुऱ्या पडायला लागतात तेव्हा अनोख्या वस्तूच्या स्वागताला आपणही चौकटी सोडून सामोरे होण्याची तयारी ठेवली पाहिजे, इतकेच मला या जिवंत आणि अस्सल नाट्याविषयी म्हणावयाचे आहे. ते जिवंत व अस्सल आहे हे सांगणे म्हणजे निर्दोषपणाची ग्वाही देणेही नव्हे, हेही आपण इथेच नोंदवून ठेवू.

१२८/ रंगविमर्श