पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवहार सांभाळतातच, पण हा अपरिहार्य म्हणून सांभाळला जाणारा व्यवहार स्वप्नांच्याइतका मूल्यवान समजत नाहीत. सतीश आणि उषा हे तर रोमँटिक आहेतच, पण काकाजी आणि आचार्यसुद्धा रोमँटिक आहेत. रसिकतेने भारावलेली, आदर्शाने भारावलेली, स्वप्नांना आपल्या कवेत घेण्यासाठी स्वतःचे पंख जाळून घेण्यास सिद्ध झालेली, सर्वांनाच समजून घेणे आणि त्यांना साभाळून घेणे यात रस मानणारी सगळीच माणसे वेगवेगळ्या पातळीवरील मिटिक असतात. वास्तवाच्या खडकावर दढपणे उभे राहन आम्ही वैज्ञानिक बुद्धीने इतिहासप्रवासाचा वेध घेतो आहोत. आम्ही स्वप्नाळू नसून रोखठोक व्यवहार सांगणारे जडवादी आहोत असा उच्च रवाने उद्घोष करणारे महात्मे ह्या शतकातले सर्वांत मोठे स्वप्नद्रष्टे आहेत हे आपण विसरतो आहो. स्वप्पांच्यावर प्रेम करणे ही मानवी मनाची न संपणारी जिद्द आहे.
  कुणी हरवलेल्या प्रेमाचे दुःख झाकण्यासाठी त्यावर विनोदी फुलांची चादर अंथरतो. कुणी आपल्या भंगलेल्या स्वप्नांचे प्रेत आणि भ्रमनिरास आततायी आक्रमकतेने झाकू पाहतो आणि कुणी हसण्याची एक कुंकर मारून सर्वांनाच स्वाभाविकपणे जगण्याचे भान देऊ पाहतो. हे सगळेच स्वप्नाळू आहेत. कुणाची स्वप्ने लहान असतील, कुणाची स्वप्ने मोठी असतील, इतकाच त्यांच्यात फरक असतो. आपल्या खास हिंदी उर्दूने प्रभावित झालेल्या इंदुरी शैलीच्या मराठीत काकाजी जेव्हा सांगतात, “पोरींनो, जग सुंदर आहे बरे. बेटी, त्याचा राग नका करू." तेव्हा काकाजी स्वपच सांगत असतात. 'जंगल म्हणजे माणसाचे मन विशाल करणारी केवढी मोठी शाळा आहे.' हे काकाजींचे मत म्हणजे पुन्हा एक स्वप्नच आहे. या सगळ्याच एक प्रकारच्या रोमँटिक असणाऱ्या मंडळींच्या जीवनाचा या नाटकात एक चमत्कारिक असा सरमिसळ गुंता झालेला आहे. काकाजी जेव्हा विचारतात, “भैय्या, काय आहे सगळा हा दुनियेचा तमाशा?" त्या वेळी ते एका स्वप्नाला दुसऱ्या स्वप्नातून उत्तर शोधीत असतात. हे नाटक कितीही खळखळत असले तरी तो समुद्र किनाऱ्यावरील लाटांचा खेळ असतो. हा खेळ एकाच वेळी आकाश पिऊन बसलेल्या समुद्राच्या गांभीर्याचा आणि क्षणोक्षणी पोटातून फुटून ओठावर येणाऱ्या फेसाळणाऱ्या हास्याचा अनुभव देत असतो. या नाटकातील विनोदाचे स्वरूप हे असे आहे.
  टीकाकार समजतात त्याप्रमाणे हे नाटक तिसऱ्या अंकाच्या शेवटी गंभीर

तुझे आहे तुजपाशी / १२५