पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण या नाटकात दोन व्यक्तींच्या संघर्षाची कथाच नाही.

खरा संघर्ष दाखवतच नाही.
  काकाजी आणि आचार्य परस्परांच्या संघर्षात उभेच राहात नाहीत. ती भिन्न मनोवृत्तीची माणसे आहेत. संघर्ष होत असेल तर ह्या दोन्ही वृत्तींचे महत्त्व जाणवणाऱ्या इतर व्यक्तींच्या मनात होतो. संघर्ष उषा, श्याम, गीता यांच्या मनात आहे. या नाटकाचा विषय नसणारा एक संघर्ष आचार्यांच्या मनात आहे, पण आचार्य आणि काकाजी यांच्यात कोणताही संघर्ष नाही. उषा आणि सतीश यांनी परस्परांवर प्रेम करावे असा काही काकाजींचा प्रयत्न नाही. हे प्रेम जुळते आणि प्रियकर-प्रेयसी परस्परांचा निरोप घेतात तरीही अजून काकाजींची सतीशशी ओळख झालेली नाही. काकाजी व सतीश यांची भेट उषा व सतीश या जोडीने निरोप घेतल्यानंतर सात-आठ वर्षांनी होते. दोघांचे प्रेम जुळवणारे काकाजी नव्हेत. या प्रेमात अडथळा आणून चक्रवाकांच्या जोडप्याचा वियोग घडवून आणणारे आचार्य नव्हेत. कारण उषेने आचार्यांना पहिल्या अंकात प्रथमच पाहिलेले आहे. उषा आणि सतीश यांच्या मीलनाला आचार्यांचा अडथळाही नाही आणि हे मीलन घडविण्यासाठी काकाजींना प्रयत्नही करावा लागत नाही. असे या नाटकाचे कथानक आहे. म्हणून या नाटकात जो संघर्ष आहे तो दोन व्यक्तींच्यामध्ये नाही, दोन भिन्न जीवनविषयक दृष्टिकोणांच्या आकर्षणामुळे तरुणांच्या मनात होणारा मानसिक संघर्ष या नाटकात दिसतो.

विजय कोणाचा?
  म्हणूनच या नाटकात विजय होतो तो काकाजी या माणसाचा नव्हे. विजय काकाजी या व्यक्तीच्या जीवनाकडे पाहण्याच्या उदार समंजस दृष्टीचा होतो. तसे काकाजींचे मत सर्वांच्याविषयी चांगलेच आहे. लोकांनी उगीचच अशी समजूत करून घेतलेली आहे की काकाजी जीवनातील ध्येयवादाच्या विरुद्ध आहेत. तसे खरे म्हणजे काकाजींच्या विचारात काही नाही. काकाजींच्याच पद्धतीने सांगायचे तर त्यांना भगवद्गीता या पुस्तकात दोष दिसत नाहीत; ते फार मोठे पुस्तक आहे हे काकाजींनाही मान्य आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की आपण सामान्य आहोत. जगातल्या एकाही मूल्यवान उदात्त गोष्टीला काकाजींचा विरोध नाही; त्यांचा विरोध एखादी उंच उडी घेण्याच्या प्रयत्नात येणाऱ्या

तुझे आहे तुजपाशी / ११७