पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४. येशूनें पांच हजार मनुष्यांस भोजन घातलें.

 येशू तारवांतून उतरल्यावर शिष्यांसुद्धां एकीकडल्या जागेत गेला. आणि बाहेर येऊन मोठा समुदाय पाहि- ला, व ज्या मेंढरांस मेंढपाळ नाहीं त्यांसारिखे ते होते ह्मणून त्यांविषयी कळवळला, आणि त्यानें त्यांस देवा- च्या राज्याविषयीं उपदेश केला, व त्यांतील दुखणेक- यस बरे केल्यावर संध्याकाळ झाला तेव्हां त्याचे शि- ष्य त्याकडे येऊन ह्मणाले, ही रानांतली जागा आहे, आणि आतां वेळ होऊन गेली आहे; त्यांनी गांवांमध्ये जाऊन आपणांकरितां खाण्यास विकत घ्यावें ह्मणून स- मुदायांस निरोप दे, कारण त्यांजवळ खायास कांहीं ना- हीं. परंतु येशू त्यांस ह्मणाला, त्यांस जाण्याची गरज नाहीं, तुझी त्यांस खायास द्या. शिष्य पुनः त्याला झ- णाले, आह्मी जाऊन पांच पन्नास रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांस खायाला द्याव्या काय ? त्यानें त्यांस झटलें तुह्मांजवळ किती भाकरी आहेत ? तेव्हां त्या- च्या शिष्यांतील एक शिमोन पेत्रसाचा भाऊ अंद्रयास त्याला ह्मणाला, एथें एक पोरगा आहे, त्याजवळ जवा-