पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

च्या पांच भाकरी व दोन मासोळ्या आहेत, परंतु त्या इतक्या जणांस काय? येशू बोलला, तीं इकडे मजपाशीं आणा. मग समुदायास पन्नास पन्नासांच्या पंक्ति करून गवतावर बसविण्यास शिष्यांस आज्ञा केली. तेथें तर सुमारें पांच हजार पुरुष होते. त्यांनी त्याप्रमाणें करून सर्वांस बसविलें. मग त्यानें त्या पांच भाकरी व दोन मासे घेऊन आकाशाकडे पाहून त्यांविषयीं आशीर्वाद मागितला. मग ती मोडून समुदायाला वाढण्याकरितां शिष्यांस दिलीं. तेव्हां सर्व जेऊन तृप्त झाले. नंतर त्यानें आपल्या शिष्यांस सांगितलें कीं, कांहीं फुकट जाऊं नये ह्मणून उरलेले तुकडे गोळा करा. तेव्हां जवाच्या पांच भाकरीचे जे तुकडे राहिले ते त्यांनी गोळा करून त्यांच्या बारा टोपल्या भरल्या. जेवणारे पुरुष तर बा- यका व लेकरें खेरीज करून सुमारें पांच हजार होते. हा चमत्कार पाहून त्या मनुष्यांनी झटलें कीं जो जगांत येणारा भविष्यवादी तो निश्चयें हाच आहे. मग त्यानें शिष्यांस तारवांत बसून पलीकडे जाण्यास आज्ञा केली. ( मात्थी १४. १५-२१; मार्क ६. ३५-४४; लूक १. १२-१७; यो. ६.५ - १४. )