पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

णि त्याने याचा घात करायाकरितां याला बहुत वेळां अग्नींत व पाण्यांत टाकलें. परंतु तुझ्यानें कांहीं करवेल तर आह्मावर करुणा करून आमचें सहाय्य कर. येशू त्याला ह्मणाला, तुझ्यानें विश्वास धरवेल तर; विश्वास धरणाऱ्याला सर्व साध्य होतें. तेव्हांच त्या मुलाचा बाप डोळ्यांस आसवें आणून असें ओरडला कीं, हे प्रभू, मी विश्वास धरितों, माझ्या अविश्वासाविषयीं मला सहाय्य कर. मग समुदाय एकत्र धांवत येत आहे असें पाहून येशूनें अशुद्ध आत्म्यास धमकाविलें कीं, अरे मुक्या व बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करितों, यांतून निव व पुन्हां यांत जाऊं नको. तेव्हां तो ओरडून व त्याला फार पिळून निघाला, आणि तो मेल्यासारिखा झाला, झणून तो मेला असें बहुतेक लोक बोलू लागले. पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठविलें व बरें करून त्याच्या बापाजवळ परत दिलें. मग देवाच्या महत्वावरू- न सर्व थक्क झाले. ( मात्थी १७.१४ - २१; मार्क. ९.१४ - २९, ( लूक. ९३७-४३. )