पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



ऊन त्यानें त्यांच्या डोळ्यांस हात लाविला, आणि ला- गर्लेच त्यांस दिसूं लागलें. मग ते देवाचा महिमा वर्णीत त्याच्या मार्गे चालले; आणि सर्व लोकांनीं देवाची स्तुति केली. ( मात्थी. २०. २९-३४; मार्क. १०.४६-५२; लूक. १८. ३५ -४३. )


३. येशूने एका भूतग्रस्त मुलास बरें केलें.

 एके दिवशीं बहुत लोक येशूपाशीं आले असतां असें झालें कीं, एक मनुष्य त्यापुढे गुडघे टेकून बो- लला, हे प्रभू, माझ्या पुत्रावर दया कर, कांकीं तो मा- झा एकुलता आहे. त्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथें कोठें त्याला धरितो तेथें त्याला आपटून टाकतो, आणि हा तोंडाला फैंस आणून आपले दांत कडकडां खातो व सुकून जातो. तो कधीं अनीत व कधीं पाण्यांत पडतो. मग त्यांनी त्याला येशूकडे आणिलें, तेव्हां त्या- ला पाहतांच आत्म्याने त्याला पिळून टाकलें, आणि तो भूमीवर पडून तोंडाला फेस आणून लोकू लागला. मग येशूने त्याच्या बापाला पुसलें कीं, हें याला होऊन कि- ती काळ झाला ? त्यानें झटलें कीं, बाळपणापासून; आ-