पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचारलें कीं, कोणत्या घटकेस त्याला उतार पडूं लागला? त्यांनी उत्तर दिलें कीं, काल सातव्या तासीं त्याचा ताप निघाला. यावरून तुझा पुत्र वांचेल असें येशूनें त्याला सांगितलें त्याच घटकेस हैं झालें असें बापाने जाणलें; आणि त्यानें व त्याच्या घराण्यानें येशूवर विश्वास ठेविला.
( योहान. ४.४६ - ५४. )


२. येशूनें दोन अंधळ्यांस दृष्टि दिली.

 एकदां येशू आपल्या शिष्यांसुद्धां येरीहो शहराहून निघून जात असतां त्याच्याबरोबर पुष्कळ लोकांचा स- मुदाय होता. आणि वाटेवर बसलेले दोन अंधळे येशू जवळून जात आहे हें ऐकून ओरडत बोलले, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आह्नावर दया कर. पण उगेंच राहा असें समुदायानें त्यांस दबाविलें, परंतु ते अधिकच ओ- रडत बोलले, हे प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आह्मावर दया कर. तेव्हां येशूनें उभे राहून त्यांस बोलावून झटलें, म्या तुह्मांसाठी काय करावें ह्मणून मागतां ? ते ह्मणाले, हे प्रभू, आमचे डोळे उघडावे. तेव्हां येशूला कळवळा ये-