पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बंधुजनहो, पुढे ज्या सविस्तर गोष्टी लिहिल्या आ- हेत, त्या वाचल्याने येशूचे चमत्कार कोणत्या प्रकारचे होते हैं समजेल. आणि त्यावरून तुझी असा विचार क- रावा कीं ज्याच्या हातून अशी कृत्ये घडलीं तो खरोखर देवाकडून आलेला तारणारा होता.


१. येशूनें एका दरबारी मनुष्याच्या मुलास
बरें केलें त्याविषयीं.

 कपरणाहूम शहरांत कोणी एक दरबारी मनुष्य असे. त्याचा मुलगा फार आजारी पडला, तेव्हां त्यानें येशूकडे येऊन माझ्या पुत्राला बरें करावें अशी विनंती केली. तेव्हां येशूनें त्याला झटलें, तुझी चमत्कार व उत्पात पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारच नाहीं. दरबारी त्याला झणाला, महाराज, माझा मुलगा मेल्यापूर्वी ये. येशूनें त्या- ला झटलें, जा, तुझा पुत्र वांचेल. तेव्हां तो दरबारी मनुष्य येशूच्या वचनावर विश्वास ठेवून गेला. आणि जात असतां त्याचे चाकर त्याला भेटले, आणि त्यांनी सांगितलें कीं आपला मुलगा वरा झाला. बापाने त्यांस