पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बंधुजनहो, येशू स्त्रीस्त हा असा तारणारा आहे. त्याचें सामर्थ्य व दया व पवित्रपण आणि इतर सर्व गु- ण अपार आहेत. त्यानें मनुष्याच्या उद्धारासाठीं अव- तार घेतला. त्याच्या अवताराला १८८६ वर्षे झाली. तो जगांत असतां त्यानें मी देवाचा पुत्र व मनुष्यांचा तार- णारा आहे असें सांगितले; आणि त्याविषयीं बहुत प्र माणें दाखविलीं, त्यांपैकीं एक प्रमाण त्याचीं चमत्कारि- क कृत्यें होत.
 बंधुजनहो, येशू खीस्तानें जगांत राहून पुष्कळ व मोठे चमत्कार केले, त्यावरून तो देवाकडून आला होता असें निश्चयें सिद्ध होतें; कारण देव संगतीं असल्यावां- चून कोणाच्याने खरे चमत्कार करवणार नाहींत. ईश्वर पवित्र, सत्य व न्यायी आहे, यास्तव तो ठक व ढोंगी मनुष्यास खोट्या गोष्टी स्थापित करायास आपलें साम- र्थ्य देणार नाहीं. परंतु येशूनें आपण देवाचा पुत्र व मनुष्याचा तारणारा आहें हैं स्थापन करण्यास चमत्कार केले. यावरून असें दिसतें कीं, येशू खीस्तामध्यें ईश्वरी शक्ति होती; आणि ईश्वरी सामर्थ्यानें जी गोष्ट स्थापित झाली ती गोष्ट खरी आहे.