पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
CHRIST'S MIRACLES.
येशू खीस्ताचे चमत्कार.
येशू खीस्ताच्या चमत्कारांसंबंधी पवित्र शास्त्रांतून
घेतलेले वर्णन.

 बंधुजनहो, सर्व मनुष्य पापी आहेत. ह्या जगांत पा- पविरहित असा कोणी मनुष्य नाहीं. देवाला पाप अगदीं आवडत नाहीं. पाप करणारावर तो प्रीति करीत नाहीं. पाप्याची अवस्था फार कठीण आहे, कारण त्याला सर्व- काळ नरकवास भोगावयाचा आहे. असें आहे ह्मणून आपणाला एक तारणारा पाहिजे. जर तारणारा मिळाला नाहीं, तर आपण पुण्य करून नरकाच्या पीडेपासून सु- दूं असें नाहीं. पाप अत्यंत मोठें आहे ह्मणून आपणाला तारणाराही अपार शक्तिमान पाहिजे. परंतु अपार साम- र्थ्य मनुष्याला अथवा दूतालाही नाहीं. जर ईश्वररूपी तारणारा मिळेल तरच आपले तारण होईल.