पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५ )

यासाठी दिला कीं, जो कोणी त्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊं नये, तर त्याला सर्वकाळचें जीवन व्हावे.” (यो० ३:१६.) “ जो कोणी प्रभूच्या नांवानें हांक मारील तो तरेल.” (प्रे ०२:२१) " पाहा मी दारा- शीं उभा राहतों व ठोकतों, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आंत येईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो मज- बरोबर जेवील. ( प्रग० ३:२० ) " अहो कष्टकरी आणि ओझ्याने लादलेले, तुम्ही सर्व माझ्याजवळ या म्हणजे मी तुम्हांस विसावा देईन." ( मात्थी ११:२८ . ) " त्याने स्वतां आमचीं पापें वाहिली. ' (१ पे०२:२४.)“तो आमच्या अपराधांमुळे चेंचलेला होता.” (यशा० ५२:५.) " प्रभु येशूवर विश्वास