पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ४ ) एकाग्रतेने पाहा. त्याचे मरण, त्याचें दुःख सोसणें, त्याचें पुण्य, त्याचें तेज, त्याची मध्यस्थि हीं स- दोदित तुझ्या ध्यानांत असोत. प्रातःकाळीं फिर- तांना त्याजकडे पाहा. रात्रीं निजतांना त्याजकडे पाहा. येशूच्या व तुमच्यामध्ये तुमचीं भये व आशा हीं न येवोत. त्याच्या मागें लगट करून चाला, ह्मणजे तो तुह्मांस अंतर देणार नाहीं. "त्याच्या योगें आह्मांस अत्यंत मोठीं व मोलवान वचनें दिलीं आहेत.” (२ पे० १ : ४ . ) " जो मजकडे येतो त्याला मी घालविणारच नाहीं." (यो० ६ : ३७) "जो इच्छितो तो जीवनाचे पाणी फुकट पिवो. (प्रग० २२:१७) “कां तर देवाने जगावर एव- ढी प्रीति केली कीं, त्याने आपला एकुलता पुत्र