पान:येशू ख्रीस्ताचे चमत्कार.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )

आमचा त्राता होय; त्याचे रक्त व त्याचे पुण्य यांक- डून आमचें तारण होते. यास्तव ज्या हाताने तूं ख्रीस्ताला धरिलें आहेस त्याकडे फारसें पाहूं नको, तर ख्रीस्ताकडे पाहा. तूं आपल्या आशेकडे पाहूं नको, तर तुझ्या आशेचा उगम जो ख्रीस्त त्याकडे पाहा. आपल्या विश्वासाकडे पाहूं नको, तर तुझ्या विश्वासाचा आरंभणारा व संपविणारा जो ख्रीस्त त्याकडे पाहा. आह्मी आपल्या प्रार्थना, आपली कमें, आपल्या मनोवृत्ति यांजकडे पाहत राहिलो तर कधीं सुख पावणार नाहीं; तर येशू मात्र आमच्या आ त्म्यास शान्ति देतो. जर आह्मांला सैतानास एकदम 'जिंकायाचे आहे व देवाशी सख्य करायाचे आहे तर तें येशूकडे पाहूनच झालें पाहिजे. तर येशूकडे